सत्यपाल महाराजांनी राष्ट्रसंतांचे विचार घराघरात पोहचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:28 AM2021-02-10T04:28:14+5:302021-02-10T04:28:14+5:30
शिवानी वडेट्टीवार : तेलीमेंढा येथे जाहीर कीर्तन नागभीड : महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या ...
शिवानी वडेट्टीवार : तेलीमेंढा येथे जाहीर कीर्तन
नागभीड : महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम नागभीड तालुक्यातील तेलीमेंढा येथे झाला.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी शिवानी वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य घडत असते. सत्यपाल महाराज आपल्या कीर्तनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार जनमानसात रुजविण्याचे कार्य करीत आहेत. या कार्यक्रमास धनराज मुंगले, नागभीड पंचायत समितीचे सभापती प्रफुल्ल खापर्डे, हिरालाल पेंटर, नगरसेवक दिनेश गावंडे, पाहार्णीचे माजी सरपंच पुरुषोत्तम बगमारे, कोटगावचे माजी सरपंच यशवंत भेडारकर, बाम्हणीचे माजी सरपंच अमृत शेंडे, प्रा धनराज खानोरकर, धनराज काटेखाये, पारस नागरे, पंकज काळबांधे, सुधीर पंदिलवार, नवखळा येथील माजी सरपंच अरुण गायकवाड यांची उपस्थिती होती.
सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी तेलीमेंढा येथे गर्दी केली होती. आयोजन तेलीमेंढा येथील जय बजरंग क्रीडा मंडळाने केले होते.