राजू गेडाम
मूल : नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रशासकीय भवनात तहसील कार्यालयासोबतच शासनाच्या विविध विभागांची कार्यालये आहेत. मात्र, दुय्यम निंबधक कार्यालय विविध कारणे पुढे करून भाड्याच्या इमारतीतच राहणे पंसत केल्याने दरवर्षी शासनाला लाखोंचा चुना लागत आहे.
जमीन खरेदी व विक्री प्रकरणांशी संबंधित दुय्यम निंबधक कार्यालय हे तहसील कार्यालयाजवळ असावे, यासाठी प्रशासकीय भवनातच जागा देण्यात आली. दुय्यम निबंधक कार्यालयाने प्रशासकीय भवनाचे बांधकाम सुरू असताना पाहणी करून कार्यालय निश्चित केले होते. जमीन व प्लॉटची खरेदी-विक्री करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करतात. त्यामुळे नवीन प्रशासकीय भवनातील जागा सोईस्कर आहे. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयाने प्रशासकीय भवनात स्थलांतरीत केले नाही. अजुनही हे कार्यालय भाड्याच्या इमारतीतच आहे. भाड्यापोटी लाखो रुपये खर्च होत आहेत.
कोट
प्रशासकीय भवनाचे बांधकाम सुरु असताना तत्कालीन दुय्यम निंबधकांनी वरच्या मजल्यावर इमारत निश्चित केली होती. बांधकाम झाल्यावर त्या ठिकाणी निवडणुकीसाठी स्ट्रांग रूम तयार करण्यात आली. त्यामुळे प्रशाकीय भवनातील खालच्या इमारतीत कार्यालयासाठी एक खोली मिळाली. रेकार्ड रूम व इतर कामासाठी पुन्हा एका खोलीची गरज आहे. याबाबत वरिष्ठांकडे कार्यवाही सुरू आहे.
-विकास बोरकर, प्रभारी दुय्यम निंबधक, मूल.