शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजनाला पसंती देत आहेत.दिवसेंदिवस पहाडावर पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासूनच सेवादासनगरसह तालुक्यातील विविध गावात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले. पंचायत समिती सभापती, जि. प. सदस्य येथे असतानाही हे आमचे काम नाही. ग्रामपंचायतीने पाणी समस्या सोडवावी म्हणून जबाबदारी झटकत आहे. नोकेवाडा ग्रामपंचायतमधील सेवादासनगर येथे भेट दिली असता, पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरू असल्याचे दिसून आले.तेलंगणा राज्यालगत असलेली नोकेवाडा ग्रामपंचायत मोठी असून नियोजनाअभावी दरवर्षीच ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. निवडणुकीत ग्रामस्थांना पाणी समस्येबाबत आश्वासने दिली जातात. मात्र, आजपर्यंत कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झालेली नाही. पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांच्या पाचविलाच पुजलेला असून जानेवारी महिन्यापासूनच सेवादासनगर येथे पाणी टंचाईची झळ सुरू आहे.७०० ते ८०० लोकसंख्या असलेल्या सेवादासनगर येथे तात्पुरती उपाययोजना म्हणून गावातील लक्ष्मण बाबू पवार यांची विहीर अधिग्रहण करून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. मात्र त्या विहिरीनेही तळ गाठल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावातील महिला व नागरिक रात्री जागरण करुन मिळेल तेथून पाणी आणतात व आपली तहाण भागवतात. गावातील सार्वजनिक विहीरही पुर्णत: कोरडी पडली असून हातपंही नादुरुस्त व बंद स्थितीत आहे. हातपंप दुरुस्त करण्याकरिता ग्रामसेवकास वेळोवेळी नागरिक सांगूनही ग्रामसेवक चालढकल करीत आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे.तेलंगणाच्या पाण्यावर भागते तहाणसेवादासनगर येथील ग्रामस्थ सध्या तेलंगणातून पाणी आणून आपली तहाण भागवित आहेत. चार ते पाच किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा येथून पाणी आणण्यासाठी सेवादासनगरच्या नागरिकांची पायपीट सुरू आहे. पाणी आणण्यासाठी महिला चक्क बैलबंडी हाकलताना दिसून येतात.गरिबांच्या कार्यक्रमांना पाणी टंचाईचे ग्रहणयावर्षी मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पडत आहेत. सेवादासनगर येथील अनेकांचे लग्न जुळले. मात्र गावातील पाण्याच्या स्त्रोतांची पातळी पूर्णत: कोरडी पडल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. गावातील काही सदन नागरिक आपल्या लग्न समारंभात येणाºया पाहुण्यांची व नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पाण्याचे कॅन विकत घेत आहेत. मात्र गरिबांचे हाल होत आहे.
पाण्यासाठी सेवादासनगरवासीयांची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:03 AM
वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजनाला पसंती देत आहेत.
ठळक मुद्देलग्न समारंभानाही फटका : घोटभर पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष