‘शिवार’ पुरवणीमुळे भद्रावतीच्या प्राचीन व आधुनिक इतिहासाचे रूप समोर आले

By admin | Published: April 30, 2016 12:56 AM2016-04-30T00:56:28+5:302016-04-30T00:56:28+5:30

भद्रावती: लोकमत शिवार पुरवणीच्या माध्यमातून भद्रावतीचे प्राचीन आणि आधुनिक रुप जनमानसापर्यंत पोहचले.

The 'Shijar' supplement provided the ancient and modern history of Bhadravati | ‘शिवार’ पुरवणीमुळे भद्रावतीच्या प्राचीन व आधुनिक इतिहासाचे रूप समोर आले

‘शिवार’ पुरवणीमुळे भद्रावतीच्या प्राचीन व आधुनिक इतिहासाचे रूप समोर आले

Next

बाळू धानोरकर : लोकमत शिवार पुरवणीचे प्रकाशन
भद्रावती: लोकमत शिवार पुरवणीच्या माध्यमातून भद्रावतीचे प्राचीन आणि आधुनिक रुप जनमानसापर्यंत पोहचले. तालुका तथा शहराच्या विकासात्मक कार्यासाठी लोकमतची नेहमीच धडपड असते. ती धडपड दुसऱ्यांनाही करायलाही लावते. भास्कराच्या कृपाप्रसादे.... होईल भद्रावती, या लेखाच्या माध्यमातून सोलर पॉवर पार्क निमिर्ती माहिती देण्यात आली. हा प्रकल्प भद्रावतीत होण्यासाठी विधानसभेत हा विषय आपण रेटून धरु, असे आश्वासन वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिले. भद्रावती नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित लोकमत शिवार पुरवणीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते.
आ. धानोरकर यांनी फित कापून शिवार पुरवणीचे प्रकाशन केले. प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव, बँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक इंगळे, रमेशचंद्र मालपाणी उपस्थित होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी लोकमतच्या शिवार पुरवणीचे कौतुक केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे लोकमत हे वृत्तपत्र असल्याचाही उल्लेख केला. मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी लोकमतचे कौतुक करीत आपल्या महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणी सांगितल्या. तसेच विकासात्मक कार्यात लोकमत नेहमीच पुढे असल्याचे ते म्हणाले. संचालन प्रा. सचिन सरपटवार तर आभार विनायक येसेकर यांनी मानले. याप्रसंगी लोकमतचे वार्ताहर डॉ. यशवंत घुमे, शंकर भरडे, रत्नाकर डांगे, रत्नाकर ठोंबरे, विनेशचंद्र मांडवकर, वतन लोणे, सदानंद आगबत्तनवार, किशोर खेमस्कर, लोकमत सखी मंच संयोजिका अल्का वाटेकर, अनिल कार्लेकर, विनायक पतरंगे, रामू वालदे, उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The 'Shijar' supplement provided the ancient and modern history of Bhadravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.