रेती तस्करीची सहा वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:59 AM2018-05-09T00:59:24+5:302018-05-09T00:59:24+5:30
अवैध रेती तस्करी करताना येथील महसूल कार्यालयाच्या पथकाने सहा वाहने जप्त केली. दोन वाहनांच्या मालक व चालकावर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केल्याने रेती तस्करात धास्ती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : अवैध रेती तस्करी करताना येथील महसूल कार्यालयाच्या पथकाने सहा वाहने जप्त केली. दोन वाहनांच्या मालक व चालकावर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केल्याने रेती तस्करात धास्ती निर्माण झाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात रेतीसाठी पंधरा घाटांचा लिलाव झाला. या पंधराही घाटांद्वारे नऊ कोटींचा महसूल प्राप्त झाला. परंतु, काही घाटांवरून अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मियताच तहसील कार्यालयाच्या पथकाने पाळत ठेवली.
यामध्ये एमएच-४० एके-५८७१, एमएच-३६-एफ-८२, एमएच-४० बीजी-४६४०, एमएच-४० बीजी ०२२०, एमएच- ३४ ए ५७२६, एम-४० बीजी ४९९४ क्रमांकाची वाहने जप्त करण्यात आले. या वाहनांमध्ून २५ ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक करण्यात येत होती.
सर्व वाहनाचालकांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४७ (७) (८) नुसार दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी उमेश काळे, तहसीलदार विद्यासागर चव्हान, नायब तहसीलदार सुभाष पुंडेकर, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.