जनावरांची तस्करी; चार जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:03 PM2019-02-25T23:03:18+5:302019-02-25T23:03:36+5:30
पीकअप वाहनामध्ये भरुन कत्तलीसाठी नेणाऱ्या ११ जनावरांची सुटका करुन चार जणांना पडोली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व्ही. एम. ढाले यांच्या मार्गदर्शनात ताडाळी टी-पार्इंट येथे केली. या कारवाईत १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पीकअप वाहनामध्ये भरुन कत्तलीसाठी नेणाऱ्या ११ जनावरांची सुटका करुन चार जणांना पडोली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व्ही. एम. ढाले यांच्या मार्गदर्शनात ताडाळी टी-पार्इंट येथे केली. या कारवाईत १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शेख नदीर शेख नबी (२४) रा. गोयेगाव आसिफाबाद, सतीष विनोद चोपावार (२४) लक्कडकोट, इब्राहिम शेख (२७) लक्कडकोट, बाबुलाल शालिक आंबोरकर (२२) रा. वरोरा असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर मुख्य आरोपी नदीम कुरेशी रा. यात्रा वॉर्ड वरोरा फरार आहे.
दोन पीक अप वाहनामध्ये जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पडोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ताडाळी टी पार्इंटवर नाकाबंदी करुन एम एच ३४ बी जी ४२२७ व एम एच ३४ बी जी ३५०५ वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये जनावरे आढळून आली. तर त्यांच्यासमवेत असणारी स्विफ्ट एम एच ३४ बी एफ २९७२ जप्त करुन वाहनचालकाला अटक करण्यात आली.
या कारवाईत रोख रक्कम, वाहने, मोबाईल असा १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार ढाले यांच्या नेतृत्वात लक्ष्मण रामटेके, गणेश जोमदड, सुमीत बुरडे यांच्या पथकाने केली.