लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील रेल्वे स्थानक परिसरातील मध्य रेल्वे को-आॅपरेटीव्ह सोसायटीमार्फत स्टाफ कॅन्टीन रेल्वे प्रशासनाने बंद केली. परिणामी कॅन्टीन चालविणाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे सावट आले. रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी कारभाराविरूद्ध कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहायक रेल्वे मंडळ अध्ािकाऱ्यांच्या कार्यालयातच ठिय्या मांडला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन चांगलेच हादरले आहे. न्याय मागण्या सोडविण्यात याव्या म्हणून सोमवारीपासून आमरण उपोषण सुरू केले असून आरपारची लढाई लढण्याच्या मानसिकतेत आंदोलन केले जात आहे.मध्य रेल्वे कन्झुमर को आॅप. सोसायटीच्या माध्यमातून सन १९५९ पासून रेल्वे स्टाफ कॅन्टीन सुरू आहे. मात्र विभागीय रेल्वे अधिकाºयांनी ३ आॅक्टोबर २०१७ च्या आदेशान्वये सोसायटीचा कारभार बरोबर नसल्याच्या कारणावरून स्टॉफ कॅन्टीन बंद केली. विशेष म्हणजे स्टॉफ कॅन्टीन सुरू असलेल्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाºयांनी अद्यावत विश्रामगृह व प्रतीक्षालयाच्या बांधकामाची गरजेपोटी कॅन्टीन बंद केल्याचे सागत आहे. परंतु यातील कारण वेगळेच असल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सोसायटीच्या कारभारात सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकाºयाच्या आदेशाची पायमल्ली करून विभागीय रेल्वे अधिकाºयाने जाणीवपूर्वक ढवळाढवळ करून मध्य रेल्वे कन्झुमर को आॅप सोसायटीद्वारा संचालित स्टॉफ कन्टीन बंद करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.कॅन्टीन कर्मचाºयांनी रेल्वे स्टॉफ कॅन्टीन त्वरीत सुरू करण्याच्या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येथील रेल्वे चौकालगतच्या सहाय्यक रेल्वे मंडळ अधिकाºयांच्या कार्यालयातच आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनात अन्नतप्पा वाकटी, चंद्रशेखर तुरकर, संजय लांबे, सुशिल खिराळे यांच्यासह अन्य कर्मचाºयांचा सहभाग आहे.
रेल्वे स्टाफ कॅन्टीन कर्मचाऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:21 PM
येथील रेल्वे स्थानक परिसरातील मध्य रेल्वे को-आॅपरेटीव्ह सोसायटीमार्फत स्टाफ कॅन्टीन रेल्वे प्रशासनाने बंद केली. परिणामी कॅन्टीन चालविणाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे सावट आले. रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी कारभाराविरूद्ध कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहायक रेल्वे मंडळ अध्ािकाऱ्यांच्या कार्यालयातच ठिय्या मांडला आहे.
ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण