चेकबरांज येथे पाच खाटांचा सेल्फ आयसोलेशन कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:12 AM2021-05-04T04:12:03+5:302021-05-04T04:12:03+5:30
भद्रावती : तालुक्यातील ग्रामपंचायत चेकबरांजअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेकबरांजमध्ये कोविड सेल्फ आयसोलेशन कक्ष उभारण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात ...
भद्रावती : तालुक्यातील ग्रामपंचायत चेकबरांजअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेकबरांजमध्ये कोविड सेल्फ आयसोलेशन कक्ष उभारण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, याचा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याचीच दखल घेत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आदेशानुसार ग्रामपंचायत चेकबरांजच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पाच खाटांचा कोविड-१९ चा सेल्फ आयसोलेशन कक्ष उभारण्यात आला. यामुळे चेकबरांज गावातील कोविड रुग्णांना उपचार घेणे शक्य होईल. या कोविड विलगीकरण कक्षाचे निर्जंतुकीकरण करून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी सरपंच प्रभा गडपी, उपसरपंच राजू डोंगे, ग्रामविकास अधिकारी विनोद मेश्राम, आशा वर्कर निशा संजय मेश्राम व कर्मचारी लक्ष्मण कोवे, रमेश बोनकूर, प्रिया खामणकर उपस्थित होते.