महाराष्ट्रदिनी विदर्भ राज्याकरिता प्रतिकात्मक ध्वजारोहण कार्यक्रम
By Admin | Published: April 30, 2016 12:50 AM2016-04-30T00:50:39+5:302016-04-30T00:50:39+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे याकरिता मागील अनेक वर्षांपासून विविध मार्गांने आंदोलने सुरू आहेत.
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे याकरिता मागील अनेक वर्षांपासून विविध मार्गांने आंदोलने सुरू आहेत. वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण विदर्भ ढवळून निघाले आहे. त्यामुळे परत एकदा वेगळा विदर्भाचा आवाज बुलंद होऊ पाहत असून जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८.३० वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचे प्रतिकात्मक ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संयुक्त महाराष्ट्रात विदर्भावर अन्यायच केला जात असून अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे वेगळा विदर्भ घोषित करावा, या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहण कार्यक्रम विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट जिल्हा शाखा तसेच जिल्ह्यातील विदर्भवादी संस्था, संघटनाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सदर ध्वजारोहण प्रतिकात्मक असला तरी जनतेची स्वतंत्र विदर्भाची मागणी किती तीव्र आहे, हे दाखविण्याकरीता शहरातील तसेच जिल्ह्यातील विदर्भवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती विदर्भवादी प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे व विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)