त्या शिक्षकांची होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:38 AM2020-12-30T04:38:22+5:302020-12-30T04:38:22+5:30
२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक होती. ग्रामपंचायत ...
२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक होती. ग्रामपंचायत निवडणुकीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी नियुक्ती केलेले शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिसांचाही आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. वरोरा तालुका वगळता अन्य ठिकाणी शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे कुठेही नमूद केले नाही. या निवडणुकीकरिता १ ते ८ जानेवारी दरम्यान प्रशिक्षण होणार आहे. शिक्षकांना कोविड १९ चाचणी करून अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. ज्यांचे अहवाल प्राप्त होणार नाही. त्यांची हजेरी गृहीत धरले जाणार नाही, असेही आदेशात नमुद आहे.
कोट
नववी ते बारावीचे शिक्षक वगळता इतर शिक्षकांनी कोविड १९ चाचणी केली नाही. पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनी ती केलेली नसल्यास व त्यांच्यात लक्षणे असल्यास कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश आहेत.
-रमेश कोळपे, तहसीलदार व निवडणूक अधिकारी