तीन एकरातील गहू व चण्याचा ढीग जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:16 AM2021-02-22T04:16:51+5:302021-02-22T04:16:51+5:30

बाखर्डी : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने तीन एकरातील गहू आणि चणा या पिकाची कापणी करून शेतातच ढिगारा ...

Three acres of wheat and gram heaps were burnt | तीन एकरातील गहू व चण्याचा ढीग जाळला

तीन एकरातील गहू व चण्याचा ढीग जाळला

Next

बाखर्डी : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने तीन एकरातील गहू आणि चणा या पिकाची कापणी करून शेतातच ढिगारा रचून ठेवला होता. अज्ञात इसमाने आग लावून हा ढिगारा जाळला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये शेतकऱ्याचे १ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषी इसमावर कार्यवाही करण्याची मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.

लखमापूर येथे दादाजी सीताराम पाचभाई यांचे शेत आहे. त्यांनी यावर्षी रबी हंगामात गहू आणि चणा पीक घेतले होते. पिकाची कापणी करून शेतातच ढिगारा रचून ठेवला होता. थ्रेशर मिळताच मळणी करण्याचा शेतकऱ्याचा बेत होता. मात्र, रात्री आग लागल्याचे कळताच शेतात धाव घेऊन पाहणी केली असता तीन एकरांतील गहू व चणा जळून खाक झाला होता. हाताशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Three acres of wheat and gram heaps were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.