खडकीजवळ पर्यटकांचा ट्रॅक्टर उलटला

By admin | Published: January 9, 2017 12:34 AM2017-01-09T00:34:31+5:302017-01-09T00:34:31+5:30

सहलीसाठी घोडाझरी येथे आलेल्या आणि एक मौज म्हणून ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलांचा ट्रॅक्टर अचानक उलटला.

Tourists flock the track around the Khadki | खडकीजवळ पर्यटकांचा ट्रॅक्टर उलटला

खडकीजवळ पर्यटकांचा ट्रॅक्टर उलटला

Next

३८ महिला जखमी : १० महिलांची प्रकृती चिंताजनक
नागभीड : सहलीसाठी घोडाझरी येथे आलेल्या आणि एक मौज म्हणून ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलांचा ट्रॅक्टर अचानक उलटला. या घटनेत ३८ महिला जखमी झाल्या. यातील १० महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. घोडाझरी जवळील खडकी येथे दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातातील जखमी महिला या नागपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. नागपूर येथील या महिला एका ट्रॅव्हल्सने घोडाझरी येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. ट्रॅव्हल्स पुढे जात नसल्याने खडकी येथे ट्रॅव्हल्स सोडून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडाझरी येथे या महिला पायदळ चालत गेल्या. दिवसभर मौजमजा करुन व पर्यटनाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाठी परत पायीच ट्रॅव्हल्सकडे निघाल्या.
या दरम्यान, वाटेत त्यांना एक ट्रॅक्टर खडकीकडे जाताना दिसले. त्यांना ट्रॅक़्टरमध्ये बसायची इच्छा झाली. त्यांनी ट्रॅक्टर चालकाशी बोलून भाडेही ठरवले व त्या खडकीकडे निघाल्या.
दरम्यान, एका वळणावर काही कळायच्या आत ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या सर्वच महिला जखमी झाल्या. यातील १० महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमीमध्ये मेघा अरविंद कहाटे (४०), सुनंदा सुखदेव सरोदे (४०), अर्चना मिलिंद गिरजे (३५), कल्पना रमेश खडसे (४८), सुप्रिया मनिष शहा (४०), अश्विनी अमोल कदम (३५), ज्योती अतुल पुजारी (४०), पूजा पंकज भुजबळ (४०), मिनाक्षी प्रशांत कोलाखरे (३९), अपर्णा चंद्रशेखर शास्त्री (३५), शर्वरी राजुरकर (४५), आरती प्रशांत सदावर्ती (३०), वनमाला वसंत मेश्राम (४५), अनिता निगडे (४०), प्रगती संजय पाठक (४७), आशा दीपक धगमवार (४४), केतकी प्रद्यूमन चावजी (४५), चंदा शिर्ष दारव्हेकर (६०), दर्शना आनंद नाईक (४०), अनुराधा अशोक देशपांडे ६०), कविता गिरीष धाडसे (३०), वर्षा विनोद ढोमणे (३५), अलका सुधाकर चोवळे (४०), अरुणा विजय संघणे (६०), हर्षा हरिश वाघमारे (५७), निलीमा विवेक पांडे (३०), वृंदा संजू तारे (४०), मेघा तारे (४५), आदिती अभय मानके (३५), पल्लवी जयंत खोले (४०), विना राम पुसदकर (४०), छाया शेखर पारधी (४९) आणि जया अरविंद देशमुख यांचा समावेश आहे. मिळेल त्या वाहनाने या सर्व जखमींनी नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tourists flock the track around the Khadki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.