आदिवासी विकास महामंडळाने केली ८६ हजार ८७५ क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:34 AM2021-02-25T04:34:24+5:302021-02-25T04:34:24+5:30

नागभीड : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी सोसायट्यांची धान खरेदी जोरात सुरू आहे. या सोसायट्यांमध्ये धानाला उत्तम भाव ...

Tribal Development Corporation procured 86 thousand 875 quintals of paddy | आदिवासी विकास महामंडळाने केली ८६ हजार ८७५ क्विंटल धान खरेदी

आदिवासी विकास महामंडळाने केली ८६ हजार ८७५ क्विंटल धान खरेदी

Next

नागभीड : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी सोसायट्यांची धान खरेदी जोरात सुरू आहे. या सोसायट्यांमध्ये धानाला उत्तम भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा धान विक्रीचा कल सोसायटयांकडे वाढला आहे. नागभीड तालुक्यात ९ आदिवासी सोसाट्यांमार्फत धान खरेदी सुरू आहे. २२ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार या सोसायट्यांनी ८६ हजार ८७५ क्विंटल धान खरेदी केली आहे.

नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तालुक्याची अर्थव्यवस्था धान पिकावरच अवलंबून आहे. तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन घेतले जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात, असा आजवरचा अनुभव आहे. शेतकरी आतापर्यंत आपले धान खासगी व्यापारी किंवा बाजार समितीत विकायचे. मात्र, मागील वर्षीपासून शासनाने तालुक्यातील आदिवासी सोसायट्यांना तर पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १ हजार ८६८ रुपये व अधिक बोनस असे असल्याने शेतकरी आपले धान सोसायटीमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर्षीही या सोसायट्यांमार्फत धान खरेदी सुरू आहे.

सोसायट्यांची धान खरेदी (क्विं.)

नवखळा सोसायटी -६५१७.७२

चिंधी चक सोसायटी -११७३६.२९

गोविंदपूर सोसायटी -७२९२.८३

कोजबी (माल) सोसायटी -९१५५.३४

गिरगाव सोसायटी - ११४९३.८३,

सावरगाव सोसायटी - १४३०९.०८

जीवनापूर सोसायटी - ७७७१.०४

बाळापूर सोसायटी - १०२८१.२७

वाढोणा सोसायटी - ८३२९.०७

Web Title: Tribal Development Corporation procured 86 thousand 875 quintals of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.