माळढोक पक्षी अधिकाधिक संख्येने वरोरा परिसरात वाढावेत, याकरिता वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये लोकसहभाग वाढल्यास निश्चितच माळढोक पक्ष्यांचे संरक्षण होईल व त्यांची संख्या वाढेल. माळढोक पक्षी वास्तव्यास असलेल्या गावामध्ये जनजागृती करण्याकरिता दुचाकी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ११ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता वरोरा शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यालगतच्या तालुका क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे. सकाळी ९ वाजता रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात येणार आहे. ही रॅली वरोरा, कळमगव्हाण, तुळाना, आष्टी, मार्डा, एकोना, पांढुर्ली, चरूर, वनोजामार्गे आल्यानंतर दुपारी एक वाजता वनोजा गणेश मंदिर येथे समारोप करण्यात येणार आहे, अशी माहिती वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड यांनी दिली.
माळढोक पक्ष्याच्या संवर्धनाकरिता दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:28 AM