ढगाळी वातावरणामुळे दिवसभर गारवाचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून सूर्य नारायण आग ओकत असतानाच रविवारी पहाटे मेघगर्जनेसह चंद्रपूर शहरात पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील काही सकल भागातील रस्त्यावर पाणी साचल्याचे बघायला मिळाले. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
एप्रिल महिना सुरु झाल्यानंतर कोरोना संकटाने तोंड वर काढले. सोबतच तापमानातही बरीच वाढ झाली. चंद्रपूरचे तापमान ४३ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचले. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून संरक्षणासाठी कुलर लावले. दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजतापासून वादळी वारा, मेघगर्जनसह पावसाने हजेरी लावली. रविवारी पहाटेही पाऊस कोसळला. दरम्यान, शहरातील काही सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले. काही नाल्यांचा गाळही रस्त्यावर आल्याने रस्ते सकाळी चिखलमय झाल्याचे बघायला मिळाले. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणात गारवा होता.