इरई नदीवर बंधारा बांधावा, खोलीकरण व सौंदर्यीकरण करावे, उड्डाणपूल झाल्यानंतर पात्रातील मातीचे ढिगारे व पूर्वीच्या जुन्या पुलाचे अवशेष हटवून नदी स्वच्छ करावी, ढिगाऱ्यावर झुडपी जंगले वाढून नदीचा प्रवाह बाधित झाला. नदीला नाल्याचे स्वरूप आल्याने ढिगारे हटवून खोलीकरण करावे,
गणेश विसर्जन, गौरी पूजन, छट पूजा कार्यक्रमासाठी ओटे बांधावे, सौंदर्यीकरणासाठी खनिज विकास निधी द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. आंदोलनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे चंद्रपूर ग्रामीण अध्यक्ष गजानन गावंडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया, नगरसेवक देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, इंटकचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील तिवारी, दुर्गेश चौबे, वसंत मांढरे, वीरेंद्र आर्य, रामदास वाग्दरकर, अजय मानवटकर, रतन शिलावार, अजय महाडोळे, प्रतीक तिवारी, बाबूलाल करुणाकर, कृष्णा यादव, पृथ्वी जंगम व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.