वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:54+5:30
लॉकडाऊन लागू झाल्यापासून प्रशासन सक्रिय आहे. शहरात संचारबंदी ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. गर्दी होत असेल तर त्यावर तोडगा काढण्यासाठी मनपा, पोलीस प्रशासन नेहमी प्रयत्नशील दिसत आहे. दरम्यान, प्रशासनाने नाकेबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अनेकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी दक्षता घेत आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने चौथ्यांदा लॉकडाऊन करत घरातच थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीदेखील चंद्रपूर शहरात अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करत फिरताना दिसत आहेत. याबरोबरच शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचाही प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून प्रशासन सक्रिय आहे. शहरात संचारबंदी ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. गर्दी होत असेल तर त्यावर तोडगा काढण्यासाठी मनपा, पोलीस प्रशासन नेहमी प्रयत्नशील दिसत आहे. दरम्यान, प्रशासनाने नाकेबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अनेकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. मात्र तरीही अनेक नागरिक प्रशासनाची नजर चुकवून विनाकरण बाहेर फिरताना दिसत आहे.
दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. तीन चाकी व चारचाकी वाहनामध्येही आसन क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती बसून फिरताना दिसत आहे. काही नागरिक मास्क न लावता बिनधास्त फिरत आहेत. प्रशासनाची नजर चुकवून आपण मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात मिरवणाºया अशा नागरिकांमुळे कोरोना संसर्गाची भीत नाकारता येत नाही. शहरातील अनेक प्रभागातील बहुतांश युवक केवळ फिरायला ट्रिपल सीट बाहेर पडत आहे. अनेकांनी तोंडावर रूमाल, मास्क लावलेला नसतो. अशांवर पोलिसांकडून कारवाई होत असतानासुद्धा बाहेर निघणाºयांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.
वाहनचालक देतात आजाराची कारणे
विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरातील गांधी चौक, जटपुरा गेट, इंदिरा गांधी चौक, बंगाली कॅम्प, बाबुपेठ आदी मुख्य चौकात पोलिसांची चमू तैनात आहे. पोलीस वाहनचालकाला थांबवून विचारणा केली असता अनेकजण आजराची कारणे सांगून गोळ्या खरेदीसाठी जात असल्याचे सांगत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.