व्याहाड बूज. येथे अशुद्ध पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 05:00 AM2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:22+5:30
पाणीपुरवठा विभाग व संबंधित कंत्राटदाराने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्याहाड बूज. येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. जीवन प्राधिकरण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जल शुद्धीकरण यंत्रणेला नादुरूस्त करण्यात आले नाही. पाणी पुरवठा करताना लागणारा ब्लिचिंग पावडर व तुरटी साठा उपलब्ध नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : व्याहाड बूज. येथील जल शुद्धीकरण योजनेद्वारे नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले. पाणीपुरवठा विभाग व संबंधित कंत्राटदाराने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्याहाड बूज. येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. जीवन प्राधिकरण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जल शुद्धीकरण यंत्रणेला नादुरूस्त करण्यात आले नाही. पाणी पुरवठा करताना लागणारा ब्लिचिंग पावडर व तुरटी साठा उपलब्ध नाही. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले. जीवन प्राधिकरण विभाग व ग्रामंचायतची कंत्राटदारावर मेहरबानी असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
जलजन्य आजारांची भीती
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असताना व्याहाळ बू येथे उलटचित्र दिसून येत आहे. जलजन्य आजार बळकावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली.