७२ तासांपासून पिल्लांसह रस्त्यालगतच ठाणतळोधी (बा.) : वन विकास महामंडळ वनपरिक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ७३ येथील सावंगी फाट्याजवळील तळोधी-बाळापूर रस्त्यावरील नाल्यात पट्टेदार वाघीण आपल्या तीन बछड्यांसहीत ७२ तासांपासून बसून आहे. त्या वाघिणीला पकडण्याचे वन विभागाकडून प्रयत्न सुरू असून गुरूवारी तिला पकडण्यासाठी रेडा ठेवण्यात आला. मात्र रेड्याला ठार मारल्यानंतरही वाघिणीला पकडण्यात यश आलेले नाही. गुरूवारी सायंकाळी पट्टेदार वाघिनीला पकडण्यासाठी वनविकास महामंडळातर्फे कक्ष क्र. ७३ असलेल्या जंगलात घटनास्थळापासून ५० मीटर अंतरावर रेडा ठेवण्यात आला. त्या रेड्यावर वाघिनेने हल्ला केला. मात्र रेड्याच्या ओरडण्यामुळे ती वाघिन पुन्हा बछड्यांकडे परतली. परिसरात वनविकास महामंडळातर्फे पानवटे तयार करण्यात आले असून ११ कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून वाघिनीने पिल्लासह ठाण मांडून बसल्याने तळोधी रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी, लग्न वऱ्हाड्यांना सावंगी मार्ग तळोधी (बा.) ला जावे लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून वाघिनीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे वाघिनीला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे. वनविकास महामंडळाचे अधिकारी घटनास्थळावर नजर ठेवून आहेत. (वार्ताहर)
वाघिणीने केली रेड्याची शिकार
By admin | Published: April 30, 2016 12:52 AM