माजरीकरांना पाणी कपातीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:00+5:302021-07-27T04:29:00+5:30
राजेश रेवते माजरी : वेकोलि वसाहतीसह माजरीतील इतर ठिकाणी अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासनाकडून सतत पाणीपुरवठा करण्यात येत ...
राजेश रेवते
माजरी : वेकोलि वसाहतीसह माजरीतील इतर ठिकाणी अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासनाकडून सतत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र वेकोलिकडून पाणीपुरवठ्यात कपात करीत असल्याने वेकोलि कामगारांसह गावातील नागरिक चिंतेत पडले आहे. पाणी कपात करण्याचा निर्णय वेकोलि प्रशासनाने घेतला आहे. केवळ शुक्रवारीच पाच तास पाण्याचे मोटर पंप चालले. शनिवारी पाण्यासाठी संपूर्ण माजरीत हाहाकार माजला होता.
रविवारी वेकोलिचे क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक नाईक आणि कार्मिक प्रबंधक जोशी यांनी पाणीपुरवठा विभागात जाऊन चौकशी केली व पाणीपुरवठा अभियंता आणि पाणीपुरवठा कर्मचारी यांच्यासोबत चर्चा केली. एवढेच नाही तर वेकोलिच्या पाचही कामगार संघटनांनी पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
वेकोलिच्या या निर्णयानुसार माजरी गावाला मिळणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कपात होण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपूर्वी वेकोलिच्या ६६ केव्ही सबस्टेशनमध्ये ६६ केव्हीचा रोहित्र ३३ केव्हीमध्ये परिवर्तीत करण्यात आला होता. वर्धा नदीच्या काठावर सहा मोटार पंप असून चार मोटार पंप सुरू ठेवले की ३३ केव्हीचे ट्रान्सफार्मर बंद पडू शकते. आता फक्त एक किंवा दोन मोटार पंपने पाणी ओढले तर नेहमीप्रमाणे पाणी लोकांना मिळणार नाही. कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
कोट
पाणी ओढणारे मोटारपंप रात्री चालणार नाही. दिवसभर सुरू राहील. पाण्याचे मोटर पंप अधिक वेळ चालत असल्याने वीज पुरवठ्याचे ट्रान्सफार्मर बंद पडू शकते. पाणी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत.
-बी . के. गुप्ता, उपमहाप्रबंधक, वेकोलि,माजरी.
260721\img-20210724-wa0103.jpg
माजरीकरांना पाणी कपातीचा बसणार फटका
दररोज ५ लाख ६५ हजार लीटर क्षमतेचे चार पाण्याचे टाक्यांनी होत होता पुरवठा