शार्टसर्किटने जळाली तणस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:46+5:302021-04-09T04:30:46+5:30
चिमूर : चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग १ मधील सहकारी राईस मिल समोरील जगन्नाथ मठाजवळील तणसाच्या ढिगाऱ्याला गुरुवारी दुपारच्या दरम्यान ...
चिमूर :
चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग १ मधील सहकारी राईस मिल समोरील जगन्नाथ मठाजवळील तणसाच्या ढिगाऱ्याला गुरुवारी दुपारच्या दरम्यान शार्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले होते. घटनास्थळाच्या बाजूला वास्तव्यास असलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका छाया कंचर्लावार यांनी घटनास्थळी धाव घेऊन न.प. चे अग्निशामक वाहन बोलावून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सुभाष हजारे हे ट्रॅक्टरने शेतातून तणीस आणून जगन्नाथ मठाजवळील खाली जागेत साठवणूक करीत होते. तणीस आणत असताना इलेक्ट्रिक पोलवरच्या तारा एकमेकांना स्पार्क होऊन शार्टसर्किट झाले. त्याची ठिणगी तणसाच्या ढिगाऱ्यावर पडली. त्यामुळे तणीस जळाली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. योगायोग की ट्रॅक्टरची मुंडी तत्परतेने काढण्यात आली. तणसाच्या ढिगाऱ्याचे आगडोंब पाहताच माजी नगरसेविका यांनी तत्काळ नगरपरिषदेला फोन करून अग्निशामक बोलावून आग आटोक्यात आणली. याच परिसरात अनेक नागरिकांच्या मोठ्या वसाहती आहेत. आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला.