महिलांनी सार्वजनिक क्षेत्रात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:06 PM2019-01-23T23:06:51+5:302019-01-23T23:07:06+5:30
महिलांमध्ये आज मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. त्यांच्यातील विधायक शक्तीचा वापर समाजासाठी व्हावा, याकरिता सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. श्री संत गाडगेबाबा धोबी वरठी (परिट) समाज मंडळाच्या वतीने दादमहल वॉर्डातील संत गाडगेबाबा स्मृती भवनातील हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महिलांमध्ये आज मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. त्यांच्यातील विधायक शक्तीचा वापर समाजासाठी व्हावा, याकरिता सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. श्री संत गाडगेबाबा धोबी वरठी (परिट) समाज मंडळाच्या वतीने दादमहल वॉर्डातील संत गाडगेबाबा स्मृती भवनातील हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेच्या छाया पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दाताळा ग्रामपंचायतच्या सदस्य लता मदनकर, सारिका वाघमारे, पुष्पा डोईफोडे, संगीता दुरूनकर, कमल सुंकरवार, कमल मेश्राम, कल्पना ठेंभेकर, मीना पालगवार व अन्य मान्यवर उपस्थित होत्या. महापौर घोटेकर म्हणाल्या, संत गाडगेबाबाचे कार्य तेजस्वी आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन महिलांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात पुढे आले पाहिजे. दाताळा ग्रामपंचायतच्या सदस्य लता मदनकर यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. समाजातील युवापिढीने सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य केल्यास अनेक समस्या दूर होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी, गायन स्पर्धा, नाट्यछटा व आरोग्य तपासणी आदी समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात आले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक संगीता दुरूतकर, संचालन माधुरी चिचोलकर, विद्या येलमुलवार यांनी केले. लता नल्लुरवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला लता नल्लूरवार, मंगला मुक्के, निलीमा रोहनकर, नंदीनी चुनारकर, अनु चुनारकर, डिलन केळझरकर, संगीता तुराणकर, विजया चिंचोलकर, मंगला ताडपल्लीवार, वर्षा मेश्राम, शुभांगी मेश्राम, अंजू लोणारे, ज्योती तंगडपल्लीवार, भारती यापाकुलवार, पुष्पा मेश्राम, वंदना मोहोड, अर्चना आकनुरवार, प्रतिभा बारसागडे, रिता रोहनकर, भारती पाकुलवार, रंजीता गड्डमवार, प्रतिभा गड्डमवार, अल्का पत्रकार, सुरेखा गड्डमवार, सुनीता पाकुलवार, किरण रोहणकर, गीता क्षीरसागर, संघटनेच्या पदाधिकारी व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.