काळ्या फिती लावून केले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:21 PM2018-01-09T23:21:05+5:302018-01-09T23:22:01+5:30
राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी औरंगाबाद येथे राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भूमिका मांडली. शासनाने गुणवत्तेचे कारण देता १० पेक्षा कमी पटसंख्या असणाºया १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आॅनलाईन लोकमत
चिमूर : राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी औरंगाबाद येथे राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भूमिका मांडली. शासनाने गुणवत्तेचे कारण देता १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तर शिक्षण सचिवांनी टप्प्याटप्प्याने ८० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा विरोध म्हणून चिमूर पंचायत समितीमधील शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करीत निषेध केला आहे.
राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी ८० हजार शाळा बंद करून केवळ ३० हजार शाळा सुरू ठेवण्याचा मास्टर प्लॅन जाहीर केला आहे. २०, ३० आणि ५० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा पहिल्या टप्प्यात बंद होणार आहे. त्यानंतर १५० पेक्षा कमी पटसंख्या कमी असणाºया शाळा बंद केल्या जातील. एक हजार पटसंख्या असणाºया शाळा यापुढे सुरू ठेवता येतील, अशी घोषणा शिक्षण सचिवांनी केली होती. त्यामुळे शासनाच्या खरा चेहरा समोर आला आहे.
याचा निषेध म्हणून मंगळवारला चिमूर पंचायत समितीतील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. चिमूरमध्ये पुरोगामी शिक्षक संघटनेचे ना.रा.कांबळे, शिक्षक भारतीचे सुरेश डांगे, रवींद्र उरकुडे, रावन शेरकुरे, संजय बरडे, धीरज नन्नावरे, कवडू लोहकरे, कास्ट्राईब संघटनेचे प्रकाश कोडापे, संजय मेश्राम यांनी शाळा बंद निर्णयाचा निषेध नोंदविला.