चिमूर नगर परिषदेत कामगारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:51+5:302020-12-23T04:24:51+5:30
चिमूर : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत २०२० - २०२१ करीता शहरातील सफाई व त्याकरिता घ्यायची काळजी या संदर्भात नगर परिषद ...
चिमूर : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत २०२० - २०२१ करीता शहरातील सफाई व त्याकरिता घ्यायची काळजी या संदर्भात नगर परिषद अधिकारी व कर्मचारी तसेच सफाई कामगारांची कार्यशाळा घेतली. यावेळी कामगारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरपरिषदेमधील विविध कामावर असणाऱ्यांचा प्रभारी मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेत शहरात काम करीत असताना कोरोनापासुन संरक्षण कसे करायचे, या विषयी अधिक्षक राकेश चौगुले यांनी माहिती दिली.
वीज अभियंता वैभव बोंदरे यांनी दिली. शहरातील कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावन्यासाठी ओला कचरा सुखा कचरा यांचे व्यवस्थापण करून ओला कचरा व सुखा कचरा वेग वेगळा करने व घंटागाडीत टाकणे महत्वाचे आहे याविषयीची माहीती नगर अभियंता ( बांधकाम) राहुल रणदिवे यांनी दिली. दरम्यान नगर परिषद मध्ये कोरोणा काळात कामावर असनारे कामगार ज्यांनी स्वताचे संरक्षण व जबाबदारी समजून काम केले असे सफाई कामगार अरुणा चांदेकर, खत निर्मीती करनाऱ्या रिना सहारे, नाली सफाई करनारे शंकर भानारकर, घंटागाडी चालविनारे तालीम शेख, व नगपरिषद कर्मचारी ममता बघेल, ललीता बेसरे यांचा कोरोणा योद्धा म्हणून गौरव करून सत्कार करन्यात आला.
यावेळी मुख्य लेखापाल आशीष पंदीलवार, संघनक अभियंता योगेश वासनिक, लिपीक शरद पाटील, प्रविण कारेकर आदी उपस्थीत होते. कार्यशाळेला बहुसंख्य कामगार उपस्थीत होते