आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्य करणाऱ्या कामगारांना कंत्राटदार ठराविक वेतनापेक्षा कमी वेतन देत असून कामगारांची लूट करीत आहे. तसेच किमान वेतन व भविष्यनिर्वाह निधीची भरणाही करीत नसल्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी, भविष्यनिर्वाह निधीचा भरणा करून थकित वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन नगर परिषद वरोऱ्याचे सभापती शेख जैरुद्दीन यांच्या मार्गदर्शनात कामगारांनी जिल्हाधिकाºयांना दिले.चंद्रपूर जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये मागील अनेक वर्र्षांपासून कामगार कार्यरत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आठ हजार ५०० ते आठ हजार ९०० रुपये प्रतिमाह कामगारास वेतन देण्याबाबत निविदेतून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किमान वेतनाप्रमाणे सात हजार ८९४ रुपये प्रति महिना वेतन कामगारांच्या बँक खात्यात जमा करून भविष्यनिर्वाह निधीचा भरणा करणे बंधनकारक होते. मात्र कंत्राटदार कामगारांना तीन हजार रुपये प्रति महिना वेतन देत आहे. तर भविष्य निर्वाह निधीचासुद्धा भरणा केलेला नाही. त्यामुळे कामगार भविष्य निर्वाह निधीपासून कामगारांंना वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी, भविष्यनिर्वाह निधीचा भरणा करून थकित वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन कामगारांतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी सभापती शेख जैरुद्दीन यांच्यासह कामगार उपस्थित होते.
आरोग्य केंद्रातील कामगारांची कंत्राटदाराकडून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:36 PM
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्य करणाऱ्या कामगारांना कंत्राटदार ठराविक वेतनापेक्षा कमी वेतन देत असून कामगारांची लूट करीत आहे. तसेच किमान वेतन व भविष्यनिर्वाह निधीची भरणाही करीत नसल्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
ठळक मुद्देकारवाईची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आरोप