पारडगाव येथील तरुणाने गावातच केली १०० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:34 AM2021-02-25T04:34:34+5:302021-02-25T04:34:34+5:30
ब्रम्हपुरी : तालुक्यातील पारडगाव हे वैचारिक तरुणांचे गाव म्हणून नावारुपाला येत आहे. याच गावातील एका ध्येयवेड्या पर्यावरणवादी तरुणाने ...
ब्रम्हपुरी : तालुक्यातील पारडगाव हे वैचारिक तरुणांचे गाव म्हणून नावारुपाला येत आहे. याच गावातील एका ध्येयवेड्या पर्यावरणवादी तरुणाने गावाला हिरवेगार बनविण्यासाठी गावात १०० वृक्षांची लागवड केली आहे.
या तरुणाचे नाव सुधीर ठेंगरी असून, तो सध्या ब्रम्हपुरी पंचायत समिती येथे उमेद अभियानांतर्गत कार्यरत आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे निसर्गसुद्धा असंतुलित झालेला बघावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. या सर्व गोष्टींची जाणीव असल्याने पारडगाव येथील या तरुणाने आपल्या गावातील नागरिकांना वृक्ष दत्तक देण्याची मोहीम राबवली.
गावातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही यासाठी फार मोलाचे सहकार्य केले. वृक्ष लागवडीचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून देत गावातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले आहे.
यावेळी नीलकंठ ठेंगरी, महावितरणचे कर्मचारी विजय दिवठे, अंगणवाडी सेविका ठेंगरी, कृषिमित्र राजू ढोरे, रोजगार सेवक मनिष गिरी, वनरक्षक सोनाली ठेंगरी व शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.