औरंगाबाद : राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टलमार्फत जि. प. मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहे. यातील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. एक बेरोजगार जि.प.मधील भरण्यात येत असलेल्या एकूण आठही पदासाठी पात्र असेल तर त्यास प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यातील ३४ जि.प.मधील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज केल्यास एका बेरोजगार युवकाला परीक्षेसाठी तब्बल १ लाख ३६ हजार रुपये एवढे शुल्क भरावे लागेल. याविरोधात डी.टी.एड., बी. एड. स्टुडंट असोसिएशनने दंड थोपाटले आहेत.औरंगाबाद जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि.१२) निवेदन देण्यात आले. जि.प.भरती प्रक्रियेतील परीक्षा शुल्काच्या नावाखाली सुरू असलेल्या अन्याय्य लुटीच्या विरोधात आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शासनाने २४ आॅगस्ट २०१७ रोजी जि.प.मधील वर्ग- ३ व वर्ग- ४ च्या पद भरतीसंदर्भात शासन निर्णय काढला होता. या शासन निर्णयानुसार राज्यातील ३४ जि.प. मध्ये एकूण आठ पदांसाठी नोकरभरती करण्यात येत आहे. या नोकरभरतीसाठी प्रत्येक पदाला स्वतंत्र अर्ज करावा लागत असून, त्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. एका जि.प.मधील आठ पदांसाठी ४ हजार रुपये मोजावे लागतील. राज्यातील सर्वच जि.प.मधील प्रत्येक आठ पदांसाठी स्वतंत्र अर्ज केल्यास १ लाख ३६ हजार रुपये एवढे शुल्क भरावे लागेल. तसेच राज्यातील ३४ जि.प.मधील एकाच पदासाठी अर्ज केल्यास बेरोजगाराला १७ हजार रुपये एवढे शुल्क लागणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.शासनाने २४ आॅगस्ट २०१७ रोजी निर्गमित केलेल्या एका शासन निर्णयानुसार जि.प.मधील वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्यात येते. मात्र प्रत्येक जि.प.साठी उमेदवार पसंतीक्रम देऊ शकतो. पसंतीक्रम दिल्यामुळे बेरोजगारांची होणारी अतिरिक्त लूट थांबली जाऊ शकते. त्यामुळे या शासन निर्णयानुसारच जि.प.मधील पदांच्या भरतीसाठी परीक्षा शुल्काची आकारणी करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जि.प.मधील पदांच्या भरतीसाठी १६ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यापूर्वी ही अन्याय्य अट दूर न केल्यास मराठवाड्यातील हजारो बेरोजगारांना पैशांअभावी नोकरीची संधी मिळणार नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर श्रीधर मगर, दिगंबर वैद्य, अक्षय येर, ऋषिकेश कवीमंडन, प्रतीक म्हस्के, प्रवीण कुलकर्णी यांच्या स्वाक्षºया आहेत.चौकटया पदांची होत आहे भरतीराज्यातील ३४ जि.प.मधील वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील आठ पदांची भरती महाभरती पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. यात सिनिअर असिस्टंट (अकाऊंटंट), हेल्थ वर्क (मेल), ज्युनिअर असिस्टंट, एक्सटेन्शन आॅफिसर, ज्युनिअर अकाऊंट आॅफिसर, हेल्थ वर्कर (मेल सेंनोल स्प्रायिंग) या पदांचा समावेश आहे.
अबब बेरोजगारांना नोकरी अर्जांसाठीच लागणार १ लाख ३६ हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:20 PM
राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टलमार्फत जि. प. मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहे. यातील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. एक बेरोजगार जि.प.मधील भरण्यात येत असलेल्या एकूण आठही पदासाठी पात्र असेल तर त्यास प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
ठळक मुद्देजि.प. भरती प्रक्रियेतील परीक्षा शुल्क : २४ आॅगस्ट २०१७ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा