माहिती लपवून कंपनीची विक्री करत उद्योजकांची १५ कोटी रुपयांची फसवणूक

By राम शिनगारे | Published: June 24, 2023 08:47 PM2023-06-24T20:47:31+5:302023-06-24T20:47:41+5:30

अकोल्यातुन दोन आरोपी ताब्यात; एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

15 crore fraud of entrepreneurs by selling the company by hiding the information | माहिती लपवून कंपनीची विक्री करत उद्योजकांची १५ कोटी रुपयांची फसवणूक

माहिती लपवून कंपनीची विक्री करत उद्योजकांची १५ कोटी रुपयांची फसवणूक

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जिनिंग प्रेसिंग, कापसाचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांची अकोला येथील कंपनी खरेदीमध्ये १४ कोटी ८२ लाख ६८ हजार ४७० रुपयांचा फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अकोला, अमरावतीतील तीन जणांच्या विरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपींमध्ये नितीन हिरदास पाटील, संदीप हरिभाऊ पुंडकर (दोघे रा. अकोला) आणि संजय जाधव (रा. अमरावती) यांचा समावेश आहे. सिडको, एन १ येथील रहिवाशी संजय त्रिलोकचंद गाेयल (अग्रवाल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीची चिकलठाणा एमआयडीसीमध्ये ऋषी फायबर्स प्रा.लि. नावाची कंपनी आहे. ही कंपनी जिनींग प्रेसिंग व कापसाच्या संबंधित व्यवहार करते. जानेवारी २०२१ मध्ये अकोला येथील एका ऐजटाने जे.जे. फाईन स्पन प्रा. लि. अकोला ही कंपनी लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडली असून, ती विक्रीसाठी असल्याचे सांगितले. त्यानुसार ऋषी फायबर्सच्या संचालकांची बैठक झाल्यानंतर फिर्यादीचे मोठे भाऊ गोपाल अग्रवाल हे एजंटला घेऊन कंपनी पाहण्यासाठी गेले. 

त्याठिकाणी कंपनी संचालक असलेल्या आरोपींसोबत बैठक झाली. त्यात ऋषी फायबर्सने जे.जे. फाईन स्पन कंपनी ४१ कोटी २५ लाख रुपयांमध्ये खरेदी केली. तेव्हा स्पन कंपनी हस्तांतरणाचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांना दिले. कंपनीच्या हस्तांतरणासाठी वेळ लागणार असल्यामुळे नितीन पाटील यांनी देणेदारांचे पैसे देण्यासाठी ७ कोटी १४ लाख ५१ हजार रुपये देण्याची विनंती केली. त्यानुसार ऋषि फायबर्सच्या बँक खात्यातुन ७ कोटी १४ लाख ५१ हजार रुपये देण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

हस्तांतरणानंतर फसवणूक केल्याचे उघड
ठरल्याप्रमाणे कंपनी हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतर विविध बँकांचे देणे, थकीत जीएसटी, आयकर, डीजीएफटीसह इतर शासकीय विभागाचे पैसेही थकीत असल्याचे कंपनीला नोटीसा आल्यानंतर उघडकीस आले. आरोपींनी कंपनीचा चुकीचा ताळेबंद दाखवला. तसेच कंपनीची काही देणीही लपवून ठेवल्याचे उघड झाले. या सर्वांमध्ये ऋषी फायबर्स कंपनीची एकुण १४ कोटी ८२ लाख ६८ हजार ४७० रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कंपनीच्या सचालकांनी एम. सिडकोत गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: 15 crore fraud of entrepreneurs by selling the company by hiding the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.