शहरात १५० प्रचार सभांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:41 AM2017-10-04T00:41:28+5:302017-10-04T00:41:28+5:30
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात महापालिका निवडणूक विभागाने १५० प्रचार सभांना परवानगी दिली आहे तर ११३ प्रचारफेºयाही शहरातून निघणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात महापालिका निवडणूक विभागाने १५० प्रचार सभांना परवानगी दिली आहे तर ११३ प्रचारफेºयाही शहरातून निघणार आहेत.
मनपा निवडणुकीत २५ सप्टेंबर नंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले. दसºयानंतर निवडणुकीतील प्रचाराला वेग येत आहे.
राज्यभरातील नेते नांदेडमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचार सभांच्या परवानगीसाठी राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांची मनपा निवडणूक विभागात परवानीसाठी गर्दी होत आहे. आतापर्यंत महापालिकेने शहरात १५० प्रचार सभांना परवानगी दिली आहे तर ११३ प्रचार फेºया, ३२४ प्रचार फलक आणि ४२ वाहनांना प्रचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
शहरात विविध पक्षांची १०६ प्रचार कार्यालयेही स्थापन होणार आहेत. याबाबतची अधिकृत परवानगी निवडणूक विभागाने दिली आहे. अजूनही प्रचारफेºया, प्रचार सभा तसेच प्रचार कार्यालयाच्या परवानगीसाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडणूक विभागात गर्दी करत आहेत.
दरम्यान, शहरात निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभाग दक्ष आहे. शहरात येणाºया नऊ मुख्य रस्त्यावर स्थिर निगराणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
आतापर्यंत या पथकाने अडीच हजार वाहनांची तपासणी केली आहे. नांदेड जिल्ह्यालगत लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांच्या सीमा आहेत तसेच तेलंगणा व कर्नाटक राज्याचीही सीमा आहे.
स्थिर निगराणी पथक अर्थात एसएसटीमध्ये तीन कर्मचाºयांचा समावेश आहे. दोन कर्मचारी, एक पोलिस, एक व्हीडीओग्राफरचाही समावेश आहे. या पथकाद्वारे अवैध दारु, रोख रक्कम, वस्तू आदींची तपासणी केली जात आहे.