वाळूज महानगर : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजीने प्रथम क्रमांक मिळविला असून, गावात ९९० मातांना या योजनेअंतर्गत ४९ लाख ५० हजारांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाºया गट प्रवर्तक व आशा कार्यकर्त्यांचा सोमवारी रांजणगावात ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव करण्यात आला.
रांजणगाव येथे सोमवारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स. सभापती ज्योती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी सदावर्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्या उषा हिवाळे, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश घोडके, डॉ. हुमेरा मोमीन, उपसरपंच अशोक शेजुळ, सदस्या नंदाबाई बडे, दत्तु हिवाळे, माधव पा. कावरखे आदींची उपस्थिती होती.
डॉ.मंगेश घोडके म्हणाले की, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंर्गत गंगापूर तालुक्यात आतापर्यंत ४ हजार ६५८ मातांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून, यातील ९९० महिला या रांजणगाव परिसरातील असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आम्रपाली तुपे तर आभार आशा सानप यांनी मानले.
कार्यक्रमाला आरोग्य सेविका रुपाली अधापुरे, आशा सानप, संजीवनी जोशी, स्मिता मुथा, आरोग्य सेवक गणेश दुखेले, आशा पर्यवेक्षिका शाहीन शेख, जया वरपे, लता दाभाडे, आम्रपाली तुपे, गोरख पवार, सोनाली लकवाळ, संतोषी चाटे, रुपाली कदम, आश्विनी गंजकर, मिना वाकळे, प्रतिभा बगाटे, भाग्यश्री घुले, सुरेखा कदम, वर्षा माने, ज्त्योती पंडीत, पुनम डोंगरे, शिल्पा काटे, वैष्णवी पायघन आदींची उपस्थिती होती.