२१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:54 PM2017-12-08T23:54:31+5:302017-12-08T23:54:35+5:30

लाच देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे लाच देणाºयासोबतच घेणाºयाविरोधातही अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल करता येते, असे असले तरी लाच देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे.

 21 crore corruption expose | २१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस

२१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस

googlenewsNext

बापू सोळुंके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लाच देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे लाच देणाºयासोबतच घेणाºयाविरोधातही अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल करता येते, असे असले तरी लाच देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. दोन वर्षांपासून मात्र लाचखोरांविरोधात एसीबीकडे तक्रारी येण्याचे राज्यातील प्रमाण सरासरी १२ टक्के कमी झाल्याचे समोर आले. मात्र, वर्षभरात एसीबीने २१ कोटी ५९ लाख ५ हजार ४४० रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला.
१० डिसेंबर हा जागतिक अ‍ॅन्टी करप्शन दिन म्हणून पाळला जातो. लाचखोरांविरोधात जास्तीत जास्त तक्रारी प्राप्त व्हाव्यात यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जनजागरण करीत असतात. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाचे फोन नंबर आणि आवाहन असलेला फलक लावलेला असतो, असे असूनही दोन वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणाºया तक्रारींची संख्या घटल्याचे समोर आले.
तक्रारदारच न आल्याने पोलिसांना लाचखोरांविरोधात कारवाई करणे शक्य होत नाही.
२०१५ मध्ये १२३४ सापळे रचण्यात आले होते, तर गतवर्षी २०१६ मध्ये ९८५ सापळे लावून लाचखोरांना एसीबीने पकडले, तर यावर्षी जानेवारीपासून कालपर्यंत केवळ ८११ सापळे रचून लोकसेवकांना जेरबंद करण्यात आले.
विशेष म्हणजे यात औरंगाबाद विभागातील यावर्षीचा सापळ्यांचा आकडा केवळ १२१ आहे. पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी प्राप्त होणाºया तक्रारींची चौकशी करून एसीबीकडून संबंधितांविरोधात गुन्हे नोंदविण्यात येतात. तीन वर्षांत अशा प्रकरणांतही कमालीची घट झाली. २०१५ मध्ये ३५ तर २०१६ साली १७ आणि यावर्र्षी आतापर्यंत २० प्रक रणांत गुन्हे नोंदविण्यात आले. ही आकडेवारी राज्यभरातील आहे. यात औरंगाबाद विभागातील दोन प्रकरणांचा समावेश आहे.
१ हजार ६७ लाचखोर पकडले
एसीबीच्या संकेत स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील घटलेल्या सापळ्यांचे सरासरी प्रमाण १२ टक्के आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत ८११ सापळ्यात १ हजार ६७ लोकसेवकांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. गतवर्षी पकडण्यात आलेल्या आरोपींची संख्या १ हजार १७१ होती.
महसूल विभाग अव्वल
लाचखोरीमध्ये नेहमीप्रमाणे महसूल विभाग अव्वल आहे. यावर्षी महसूलचे १९६ अधिकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. यानंतर दुसार क्रमांक पोलीस खात्याचा आहे. पोलीस विभागाच्या १५७ कर्मचाºयांवर एसीबीने कारवाई केली, तर तिसºया क्रमांकासाठी पंचायत समितीचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ८८ कर्मचाºयांना तर मनपाच्या ६२ जणांना लाच घेताना पकडण्यात आले.

Web Title:  21 crore corruption expose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.