३ मिनिटांत विक्रमी २११ अर्धबैठका; औरंगाबादच्या अप्पासाहेब गायकवाड यांचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 05:49 PM2020-11-13T17:49:10+5:302020-11-13T17:51:18+5:30

पहिल्या १00 अर्धबैठका ८६ व दुसऱ्या १00 बैठका अवघ्या ८४ सेकंदांत पूर्ण केल्या

211 squats in 3 minutes; Record of Appasaheb Gaikwad of Aurangabad | ३ मिनिटांत विक्रमी २११ अर्धबैठका; औरंगाबादच्या अप्पासाहेब गायकवाड यांचा विक्रम

३ मिनिटांत विक्रमी २११ अर्धबैठका; औरंगाबादच्या अप्पासाहेब गायकवाड यांचा विक्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी दावा 

औरंगाबाद : जिद्द, तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर अप्पासाहेब गायकवाड यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी गुरुवारी अवघ्या तीन मिनिटांत २११ अर्धबैठका (स्क्वॉट) मारत नवीन विक्रमाला गवसणी घालत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी मजबूत दावा ठोकला आहे. याआधी इंग्लंडच्या आंद्रे तुरन याने तीन मिनिटांत २00 अर्धबैठका मारत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद केली होती. हा विक्रम अप्पासाहेबने गुरुवारी मागे टाकला.

गुरुवारी एमएसएमच्या जिम्नॅस्टिक हॉलमध्ये सकाळी १0.४0 वाजता उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात पैठण तालुक्यातील अप्पासाहेब गायकवाड यांनी सुरुवात केली. अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणात अप्पासाहेब गायकवाड यांनी पहिल्या १00 अर्धबैठका ८६ व दुसऱ्या १00 बैठका अवघ्या ८४ सेकंदांत पूर्ण केल्या आणि अखेरच्या ११ बैठका त्यांनी १0 सेकंदांत मारताना नवीन विक्रमाला गवसणी घातली. यावेळी मुख्य निरीक्षक म्हणून शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मकरंद जोशी, निरीक्षक म्हणून नितीन कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, वेळ अधिकारी म्हणून सुरेंद्र मोदी व विजय इंगळे यांनी काम पाहिले. पूर्णवाद स्पोर्टस अँड हेल्थ प्रमोशन अकॅडमीतर्फे आयोजित या उपक्रमास माजी आमदार संजय वाघचौरे, कोषाध्यक्ष संकर्षण जोशी, प्राचार्य डॉ. शत्रुंजय कोटे, डॉ. विशाल देशपांडे, सोमाजी बलुरे उपस्थित होते.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यादृष्टीने २0१२ पासून मी सराव करीत होतो. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मकरंद जोशी यांना भेटल्यानंतर मला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. यासाठी गेल्या दीड महिन्यापासून मी कठोर सराव केला होता. त्यामुळेच तीन मिनिटात २११ अर्धबैठका आपण मारू शकलो.
-अप्पासाहेब गायकवाड

उल्लेखनीय कामगिरी :
२०१२ : एका मिनिटात ६७ दंडबैठका मारत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.
२०१४ : १ तास ४९ मिनिटात ४ हजार ४ दंडबैठका मारत युनिक वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद.
२०१६ : ३ मिनिटांत २0६ दंडबैठका मारत असिस्ट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद.

Web Title: 211 squats in 3 minutes; Record of Appasaheb Gaikwad of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.