‘घाटी’च्या रस्त्यांसाठी २.७८ कोटी रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:22 PM2018-12-24T23:22:06+5:302018-12-24T23:23:18+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच घाटीतील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच घाटीतील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.
घाटीत खड्डेमय रस्त्यामुळे एका विभागातून दुसऱ्या विभागात स्ट्रेचरवरून रुग्ण हलविण्यासाठी कर्मचारी आणि नातेवाईकांना कसरत करावी लागते. ‘घाटीतील रस्त्यावरू न स्ट्रेचर ढक लणे अवघड’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २० नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित क रून रस्त्याची ही अवस्था समोर आणली होती. या वृत्तानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे घाटी रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. घाटीच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ९४ लाख ८२ हजार इतक्या निधीचा प्रस्ताव घाटीने देऊन अनेक महिने उलटले होते. तरीही त्यास मंजुरी मिळत नव्हती. प्रस्तावाला मंजुरी मिळावी, यासाठी घाटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. अखेर घाटीतील अंतर्गत रस्त्यांसाठी २.७८ कोटींच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली.