लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तब्बल सात ते आठ वर्षांच्या प्रचंड कालखंडानंतर जिल्हा परिषदेच्या ४१ आरोग्यसेविकांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य विभागाने घेतला आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देणाºया आरोग्यसेविकांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी आरोग्य कर्मचारी संघटनेने सातत्याने आंदोलने केली. आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. एफ. बैनाडे, कार्यकारी अध्यक्षा प्रमिला कुंभारे, सचिव प्रकाश बिºहाडे व पदाधिकाºयांसोबत चर्चा करून सदरील प्रश्न सोडविण्यासाठीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने ५८ पैकी पात्र ठरलेल्या ४१ आरोग्यसेविकांना कालबद्ध पदोन्नतीचे आदेश देण्याचा निर्णय घेतला. यातील १७ आरोग्यसेविकांपैकी काहींनी जात वैधता प्रमाणपत्र, तर काहींनी सेवा खंड क्षमापित प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांना प्रशासनाने अपात्र ठरवले. सोमवारी पात्र आरोग्यसेविकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचे आदेश जारी केले जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांनी सांगितले.दुसºया टप्प्यात २५० जणांना लाभपहिल्या टप्प्यात १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाºया ४१ आरोग्यसेविकांना कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसºया टप्प्यात २४ वर्षांची सेवा पूर्ण करणा-या २५० कर्मचाºयांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात येणार आहे. जे कर्मचारी पुरेशा रिक्त जागांअभावी थेट पदोन्नतीपासून वंचित राहतात, अशा कर्मचाºयांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो, असे डॉ. खतगावकर यांनी सांगितले.
४० आरोग्य कर्मचा-यांना अनेक वर्षांनंतर लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:31 AM