३८० पैकी ४३ संस्था कार्यान्वित
By Admin | Published: September 14, 2015 11:35 PM2015-09-14T23:35:35+5:302015-09-15T00:31:23+5:30
गंगाराम आढाव, जालना शासन एकीकडे शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करून त्यावर विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात.
गंगाराम आढाव, जालना
शासन एकीकडे शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करून त्यावर विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात. मात्र दुसरीकडे शासनाच्या योजनांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याने दुग्ध व्यवसायात आलेले शेतकरी यातून बाहेर पडत आहेत.
जिल्ह्यात ३८० दूध सहकारी संस्थांची नोंदणी आहे. मात्र आज प्रत्यक्षात त्यापैकी फक्त ४३ दुध सहकारी संस्था जिल्ह्यात कार्यान्वीत असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
जालना जिल्ह्यात एकेकाळी दररोज १० ते १५ हजार लिटर दुधाचे संकलन होत असे, मात्र मागील तीन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी भीषण अशा दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यात ही वाढत्या महागाईमुळे पशुखाद्यांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना त्यांची दुभती जनावरे संभाळणे अवघड झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्री करून दुग्ध व्यवसायातून काढता पाय घेतला. त्याचा फटका जिल्ह्यात दुध व्यवसायावर बसला आहे.त्यामुळे १० हजार लिटर प्रतिदिन होणारे दुधाचे संकलन मागील तीन वर्षांपासून केवळ १० हजार लिटरच्या आत म्हणजे सहा ते सात हजार प्रतिलिटर दररोज प्रमाणे आहे.