लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सोयीच्या बदलीसाठी खोटी माहिती सादर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ७३ शिक्षकांची आज गुरुवारी चौकशी करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीने सकाळी ११ वाजेपासून सुरू केलेली चौकशी रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत अखंड सुरू होती.यासंदर्भात शिक्षणाधिकारी एस. पी.जैस्वाल यांनी सांगितले की, सार्वत्रिक बदलीसंबंधी आॅनलाईन नोंदणी करताना काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरून राज्यस्तरीय बदली कक्षाची दिशाभूल के ल्याच्या तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकाºयांकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली.आज गुरुवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरसे यांच्या उपस्थितीत शिक्षकांची चौकशी सुरू झाली. संशयित शिक्षकांचे म्हणणे ऐकू न घेण्यात आले. सकाळी ११ वाजेपासून जि.प.च्या सभागृहात शिक्षणाधिकारी जैस्वाल, सर्व गटशिक्षणाधिकारी, संबंधित विस्तार अधिकाºयांनी आॅनलाईन नोंदणीच्या वेळी राज्यस्तरीय बदली कक्षाला सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली. दरम्यान, दोषी शिक्षकांसंबंधी ही चौकशी समिती आठ दिवसांत निर्णय सीईओ पवनीत कौर यांना सादर करणार आहे.दोषींना पाठीशी घालू नकायासंदर्भात मराठवाडा जि. प. शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे की, शासनाची दिशाभूल करणाºया संशयित शिक्षकांची प्रशासनाने सखोल चौकशी करावी. शासन निर्णयानुसार संवर्ग- १ आणि संवर्ग-२ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांनी सादर केलेली कागदपत्रे योग्य आहेत का, याची गांभीर्याने चौकशी करावी. विवाहित असतानादेखील काहींनी कुमारिका, घटस्फोटित असे नमूद केले आहे. गंभीर आजारासंबंधी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जावे, यापूर्वी दर्शविण्यात आलेल्या आजाराबाबत शिक्षकाने सुटी घेतली होती का, पती- पत्नी एकत्रीकरणासाठी ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर दाखविण्यात आले आहे, या अंतराची सत्यता पडताळली पाहिजे. दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, तर कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिलीप ढाकणे, सदानंद माडेवार, संतोष ताठे आदींनी दिला आहे.
दिवसभरात ७३ शिक्षकांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:43 AM
सोयीच्या बदलीसाठी खोटी माहिती सादर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ७३ शिक्षकांची आज गुरुवारी चौकशी करण्यात आली.
ठळक मुद्देआरोप : बदलीच्या वेळी खोटी माहिती सादर केल्याचे प्रकरण