९९६ नागरिकांनी मंगळवारी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:04 AM2021-05-19T04:04:41+5:302021-05-19T04:04:41+5:30
आज फक्त तीन केंद्रांवर लसीकरण औरंगाबाद : शासनाकडून लस न मिळाल्याने मनपाकडे फक्त ४१० लसी उपलब्ध आहेत. कोव्हिशिल्डचे ११० ...
आज फक्त तीन केंद्रांवर लसीकरण
औरंगाबाद : शासनाकडून लस न मिळाल्याने मनपाकडे फक्त ४१० लसी उपलब्ध आहेत. कोव्हिशिल्डचे ११० लसी शिल्लक आहेत. बुधवारी सकाळी सिडको एन-८ येथील रुग्णालयात लस देण्यात येणार आहे. कोव्हॅक्सिनचे ३०० डोस शिल्लक आहेत. राजनगर आरोग्य केंद्र, क्रांती चौक आरोग्य केंद्र आणि एमआयटी हॉस्पिटल एन-४ या तीन केंद्रांवर प्रत्येकी १०० लसी देण्यात येणार आहेत.
१२७२ प्रवाशांची कोरोना तपासणी
औरंगाबाद : शहरात दाखल होणाऱ्या १२७२ प्रवाशांची तपासणी केली. त्यामध्ये ११ जण बाधित आढळून आले. संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या २०१ नागरिकांची तपासणी केली असता, त्यामध्ये फक्त एक बाधित आढळून आला. रेल्वेस्टेशन, विमानतळावर मंगळवारी १४५ प्रवाशांची तपासणी केली. त्यांचा अहवाल उद्या महापालिकेला प्राप्त होईल. सोमवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती, त्यातील दोनजण बाधित आढळून आले.
मालमत्ता करावरील व्याजात सूट द्या
औरंगाबाद : मालमत्ता कर न भरलेल्या मालमत्ता धारकांवर महापालिकेकडून दरवर्षी २४ टक्के आणि त्यात चक्रवाढ पद्धतीने व्याज लावण्यात येते. या व्याजावर ९० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेचे विभाग प्रमुख रवींद्र कदम यांनी मनपा प्रशासक यांच्याकडे केली.