शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

By राम शिनगारे | Published: September 2, 2022 09:53 AM2022-09-02T09:53:01+5:302022-09-02T09:53:51+5:30

पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.

A woman who set herself on fire at the police commissionerate due to her husband and neighbours harassment, died during treatment | शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : शेजारी पतीपत्नी, मुलगा आणि स्वतःचा नवरा यांची सततची मारहाण व तक्रार करूनही त्यांच्यावर पोलीस कारवाई होत नसल्यामुळे त्रस्त महिलेने पोलीस आयुक्तालय गाठून अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची खळळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली होती. ६० टक्क्यांपेक्षा अधिक जळालेल्या या महिलेचा आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला 

पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. सविता दीपक काळे (३४, रा. मांडवा, ता. गंगापूर) असे या महिलेचे नाव आहे. त्यांना १७, १५ वर्षांच्या दोन मुली आणि ११ वर्षांचा मुलगा आहे. दीपक काळे चालक असून त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा सविताचा संशय आहे. यातून ती महिला,तिचा पती आणि मुलगा तिच्याशी सतत भांडत असतं. याला सविताचा पती साथ देत असे. याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. मात्र पोलीस दुर्लक्ष करता असल्याची सविताचा तक्रार होती. यातूनच सविता गुरुवारी दुपारी पोलीस आयुक्तालयात आली.

आयुक्तालयाच्या पायरीवर सोबत आणलेले डिझेल अंगावर ओतून सविताने पेटवून घेतले. त्यांना पोलिसांनी लागलीच घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र 60 टक्के जळालेल्या सविता यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, वाळूज पोलिसांनी हा कौटुंबिक वाद होता  गेल्या दहा वर्षापासून त्यांचे भांडण होते. याची वेळोवेळी दखल घेण्यात आली होती अशी माहिती दिली आहे.

Web Title: A woman who set herself on fire at the police commissionerate due to her husband and neighbours harassment, died during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.