आम आदमी पार्टीचा नगर पालिकेवर मोर्चा
By Admin | Published: April 6, 2016 12:15 AM2016-04-06T00:15:42+5:302016-04-06T00:46:39+5:30
जालना : शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असून, समस्या निकाली काढाव्यात, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मंगळवारी नगर पालिकेवर मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
जालना : शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असून, समस्या निकाली काढाव्यात, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मंगळवारी नगर पालिकेवर मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
पक्षाने विविध ११ मागण्यांचे निवेदन पालिकेत दिले. त्यात वॉर्डातील बंद असलेल्या बोरिंंगची तातडीने दुरूस्ती करावी, महिन्यांतून २० दिवस पाणी पुरवठा करावा, महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणे, आहे ते स्वच्छगृहांची दुरूस्ती करणे, शहरातील १४९५ बोरिंंगची मोजणी करून देण्यासोबतच त्याचे चित्रिकरण देण्याची मागणी करण्यात आली. गुरूबचन चौक ते घनतरूप हनुमान मंदिर रस्त्याचे काम पूर्ण करणे, चामडा बाजारातील पुलाचे काम तात्काळ सुरू करणे आदी मागण्या आपच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.
निवेदनावर सुभाष देठे, ज्ञानेश्वर कुरील, अजित कोठारी, रामेश्वर इंदलकर, दुर्गेश केसापुरे, संजोग हिवाळे, फेरोज बागवान, जगन्नाथ ठाकूर, शेख बाबू, लक्ष्मण डकले आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)