अजिंठ्यात प्रस्थापित अब्दुल अजीज चाऊस पॅनलचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:15+5:302021-01-19T04:07:15+5:30
चाऊस गटाच्या ताब्यात मागील पाच वर्षे ग्रामपंचायत होती. त्यांनी केलेल्या विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, तसेच ...
चाऊस गटाच्या ताब्यात मागील पाच वर्षे ग्रामपंचायत होती. त्यांनी केलेल्या विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, तसेच सर्व समाजांना सोबत न घेता एका विशिष्ट समाजाच्या भरवशावर निवडणूक लढविल्याने चाऊस गटाचा सफाया झाल्याचे बोलले जात आहे. हिंदू, मुस्लिम, दलित एकता विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये अन्नू ठाकरे, महेबूबखान पठाण, लीलाबाई झलवार, अशोक झलवार, आझम सुकेडे, शकिलाबाई पठाण, नजीर अहेमद शेख, अलकाबाई चोंडिये, जमिलाबी अहेमद, अहेमदखा अकबरखा, विद्याबाई दसरे, बिस्मिल्लाबी अब्दुल रशीद, माधुरी देशमुख, असे तेरा उमेदवार, तर चाऊस गटाचे समद इसा मोहम्मदी, प्रवीण बिरारे, अनिल दसरे, सईदाबी अहेमद हे चार उमेदवार निवडून आले.
दिग्गज पराभूत
ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा चाऊस गटाचे सैयद नासेर हुसेन, दिलीप झलवार, राजेश ठाकरे, शेख लुकमान व अपक्ष महंमदखा पठाण यांच्यासह हिंदू, मुस्लिम, दलित एकता पॅनलचे शकुर कुरेशी हे दिग्गज पराभूत झाले आहेत.
फोटो :