ग्रामीणची सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:04 AM2021-05-24T04:04:06+5:302021-05-24T04:04:06+5:30
औरंगाबाद : ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण गेले दोन महिन्यांत झपाट्याने वाढले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढून सक्रिय रुग्णसंख्या आठ हजार ...
औरंगाबाद : ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण गेले दोन महिन्यांत झपाट्याने वाढले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढून सक्रिय रुग्णसंख्या आठ हजार पार पाेहोचली होती. रविवारी उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या ४ हजार ५३ पर्यंत पोहोचल्याने दिलासा व्यक्त होत असताना दररोजची मृत्युसंख्या वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात आतापर्यंत ५५ हजार ८७ रुग्ण आढळले. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील होती. मात्र, वैजापूर तालुक्याने गंगापूर तालुक्याला मागे टाकत आता दुसऱ्या स्थानी पोहोचले आहे. वैजापूर तालुक्यात आतापर्यंत ९ हजार ५११ झाली, तर या तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या ९६० असून, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण याच तालुक्यात आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद ७४५, पैठण ६४२, गंगापूर ६१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर फुलंब्री, खुलताबाद, सिल्लोड येथे अनुक्रमे २, ३, ६ अशी एकअंकी वाढ झाली, तर रविवारी सर्वाधिक वाढ वैजापूर तालुक्यात ७९ रुग्णांची झाली. रविवारी ग्रामीण भागात १४ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. लक्षणे दिसताच तपासणी करून लवकर उपचार घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहेत.