औरंगाबाद : जिल्ह्यात २९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली, तर दोन बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात उपचार पूर्ण झालेल्या ३९ जणांना सुट्टी देण्यात आली. सध्या २१३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहरातील १० तर ग्रामीण मधील २९ जण उपचार पूर्ण झाल्याने शनिवारी घरी परतले, तर शहरात १३ आणि ग्रामीण भागात चार तालुक्यांत १६ कोरोनाबाधितांची भर पडली. आतापर्यंत १ लाख ४७ हजार ७४३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १ लाख ४४ हजार ९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर उपचारादरम्यान एकूण ३ हजार ५२१ बाधितांचा मृत्यू झाल्याने, एकूण २१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीत १३ रुग्ण
घाटी परिसर १, अशिष हॉस्पिटल परिसर १, आंबेडकरनगर १, टीव्ही सेंटर १, आकाशवाणी रोड १, अन्य ८
ग्रामीण भागात १६ रुग्ण
गंगापूर ६, वैजापूर ७, पैठण २, सोयगाव १
दोन बाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात सोयगांव तालुक्यातील बोरनाल तांडा येथील ५५ वर्षीय महिला, तर माळीवाडा येथील ५५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.