पदोन्नतीचे आदेश असताना समायोजन
By Admin | Published: January 3, 2017 11:16 PM2017-01-03T23:16:43+5:302017-01-03T23:21:34+5:30
लातूर : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया राबवून पुन्हा शिक्षकांच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, असे शासन आदेश आहेत.
लातूर : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया राबवून पुन्हा शिक्षकांच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, असे शासन आदेश आहेत. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून समायोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ती थांबवून पदोन्नती द्यावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
पदोन्नतीनंतर समायोजन करण्याचे शासनाचे अध्यादेश आहेत. या आदेशाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कास्ट्राईब शिक्षक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.