फुलंब्री : तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड विजय डांगे, तर सचिवपदी ॲड शेख शहाबाज यांची नियुक्ती झाली आहे. फुलंब्रीत शनिवारी वकील संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सन २०२१ या वर्षाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. तर कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी आसाराम लहाने, सहसचिव ॲड उदय देशमुख, कोषाध्यक्ष ॲड आर. एस. काजी, ॲड. सचिन सिरसाठ, संगीता हिवराळे, एस. आर. सोनवणे, बी. यु. काळे, पी. टी. थोरात, राहुल गंगावणे यांचा समावेश आहे. यावेळी ॲड. अल्ताफ काजी, अभय पुजारी, अमित दानवे, अजिनाथ कापरे, समाधान जंगले, बी. एन. भिलवडे, नितीन सोनवणे, गजानन व्यवहारे, आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन
१] अध्यक्ष - विजय डांगे
२] सचिव - शेख शहाबाज