औरंगाबाद : पुणे येथील डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत हर्षल काटे आणि श्रेयस वालेकर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ५ बाद २८५ धावा फटकावल्या. दिवसअखेर के. तांबे २० व अनिकेत नलावडे २३ धावांवर खेळत होते.महाराष्ट्राचा कर्णधार अभिषेक पवार याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली. त्यानंतर सलामीवीर अथर्व धर्माधिकारी आणि श्रेयस वालेकर यांनी महाराष्ट्राला ३१.३ षटकांतच ९० धावांची जोरदार सुरुवात करून दिली. अथर्व धर्माधिकारी बाद झाल्यानंतर श्रेयस वालेकर आणि हर्षल काटे यांनी दुसºया गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी करीत महाराषट्राची स्थिती भक्कम केली. हर्षलने प्रथमेश बी. याच्यासोबत चौथ्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी केली. आज बाद होणारा हर्षल हा महाराष्ट्राचा अखेरचा फलंदाज ठरला. महाराष्ट्राकडून हर्षल काटे याने १४७ चेंडूंत १३ चौकारांसह ८३ आणि श्रेयस वालेकरने १७५ चेंडूंत १३ चौकारांसह ८८ धावा केल्या. बडोदा संघाकडून अंश पटेल व ए. कुर्मी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ९४ षटकांत ५ बाद २८५. (श्रेयस वालेकर ८८, हर्षल काटे ८३. अंश पटेल २/८३, ए. कुर्मी २/४४).
बडोद्याविरुद्ध महाराष्ट्राच्या ५ बाद २८५ धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:18 AM
पुणे येथील डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत हर्षल काटे आणि श्रेयस वालेकर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ५ बाद २८५ धावा फटकावल्या.
ठळक मुद्देविजय मर्चंट ट्रॉफी : वालेकर, काटे यांची अर्धशतके