औरंगाबाद : ‘गली गली में शोर है... देश का चौकीदार चोर है, ‘या मोदी सरकारचं करायचं काय... खाली मुंडकं वर पाय’, तख्त बदल दो,ताज बदल दो, बेईमानोंका राज बदल दो, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’अशा घोषणा देत आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यात नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यकर्ते हातात तिरंगी झेंडे घेऊन आधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बसस्टँडजवळ गोळा होत होते. नंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तेथेच त्यांनी बराच वेळ ठिय्या आंदोलन केले. नंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.भारतातील एचएएल या अनुभवी कंपनीकडून हा राफेल विमाने बांधण्याचा करार अनिल अंबानीच्या कसलाच अनुभव नसलेल्या कंपनीला दिला व यात ३० हजार रु. कोटींचा घोटाळा झाला. या व्यवहाराची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्यात यावी व विमानाची किंमत ६६० कोटींवरून १६७० कोटींपर्यंत कशी गेली याची चौकशी करण्यात यावी, असा आग्रह या निवेदनात धरण्यात आला.यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदींनी मोदी सरकारवर टीका केली. जि. प.चे उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील, मिलिंद पाटील, बाबा तायडे, डॉ. पवन डोंगरे, डॉ. जितेंद्र देहाडे, सुरेखा पानकडे, रवींद्र काळे, संजय औताडे, विनोद तांबे, काकासाहेब कोळगे, जि.प. सदस्य किशोर बलांडे, रमजानी, मीर हिदायत अली, इब्राहिम पठाण, शेषराव तुपे पाटील, बाबूराव कावसकर, संतोष दीडवाले, अकीफ रजवी, शेख अथर, अॅड. इक्बालसिंग गिल, रवींद्र बनसोड, छाया मोडेकर, पंकजा माने, अतिश पितळे, नगरसेवक शेख नवीद, मोईन हर्सूलकर, शेख अथर, नदीम सौदागर, इरफान पठाण, सत्तार खान, मो. झाकेर, वसंतराज वक्ते, डॉ. रमेश के. श्ािंदे, अविनाश अंभोरे, कैसरबाबा, सुभाष देवकर, संतोष भिंगारे, पठाणबाबा, मुजाहिद सय्यद, जफर शेख, शेख मजहर, मुजफ्फर खान,कैसर आझाद, कमाल खान पठाण आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
‘गली गली मे शोर है.... देशका चौकीदार चोर है’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:25 PM
‘गली गली में शोर है... देश का चौकीदार चोर है, ‘या मोदी सरकारचं करायचं काय... खाली मुंडकं वर पाय’, तख्त बदल दो,ताज बदल दो, बेईमानोंका राज बदल दो, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’अशा घोषणा देत आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यात नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
ठळक मुद्देकाँग्रेसची निदर्शने : राफेल घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी हवी