औरंगाबाद : कोरोनाच्या संकटात रूग्णवाहिका चालक अविरत सेवा देत आहेत. रूग्णवाहिका चालक कोरोना रूग्णांना वेळेवर रूग्णालयात पोहोचवणे, त्यांना औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत. या अनुषंगाने भाजयुमोचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अक्षय बाहेती यांनी घाटी येथील रुग्णवाहिका चालकांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी अभिषेक कादी, अमोल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी, प्रशासनाची आज बैठक
औरंगाबाद : जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची सोमवारी सकाळी ११ वाजता ‘कोरोना उपाययोजना आणि नियंत्रण’ यावर बैठक होणार आहे. या बैठकीवर खासदार इम्तियाज जलील यांनी बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईवरून इतर पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात ५ लाख ५१ हजार जणांचे लसीकरण
औरंगाबाद : जिल्ह्यात २२ मेपर्यंत ५ लाख ५१ हजार नागरिकांना कोरोना नियंत्रण लसीचा पहिला आणि दुसरा डोस पूर्ण झाला आहे. ग्रामीण भागात २ लाख ९ हजार ८८९ जणांनी पहिला तर ४८ हजार ८२ जणांनी दुसरा डोस घेतला. शहरात २ लाख १४ हजार ८०८ जणांनी पहिला तर ७८ हजार २३० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ग्रामीणमध्ये २ लाख ५७ हजार ९७१ जणांचे तर शहरात २ लाख ९३ हजार ३८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण
औरंगाबाद : ब्राम्हण महिला मंच आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर, माजी उपमहापौर संजय जोशी यांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून डॉ. आसावरी टाकळकर यांनी काम पाहिले. यावेळी मंचच्या अध्यक्ष विजया कुलकर्णी उपस्थित होत्या. वनिता हासेगावकर, कल्पना नागापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.