आणखी एक कुंटणखाना ठाकरेनगरात उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:02 AM2017-12-09T00:02:43+5:302017-12-09T00:02:46+5:30
प्रोझोन मॉलमधील मसाज पार्लरच्या आड सुरू असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पोलीस उपायुक्तांच्या पथकाने पर्दाफाश करून २४ तास उलटण्यापूर्वीच गुन्हे शाखेने सिडको एन-२ मधील ठाकरेनगरातील कुंटणखान्यावर शुक्रवारी दुपारी धाड मारली. या कारवाईत आन्टीला पोलिसांनी अटक केली असून, तिच्या तावडीतून तीन पीडितांची मुक्तता केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील मसाज पार्लरच्या आड सुरू असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पोलीस उपायुक्तांच्या पथकाने पर्दाफाश करून २४ तास उलटण्यापूर्वीच गुन्हे शाखेने सिडको एन-२ मधील ठाकरेनगरातील कुंटणखान्यावर शुक्रवारी दुपारी धाड मारली. या कारवाईत आन्टीला पोलिसांनी अटक केली असून, तिच्या तावडीतून तीन पीडितांची मुक्तता केली.
सुनीता गंगाधर कारभारे (४४, रा. ठाकरेनगर), असे अटकेतील महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला ही तिच्या घरात कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती खबºयाकडून गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांना मिळाली. यानंतर सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, कर्मचारी संतोष सोनवणे, सुधाकर राठोड, शेख नवाब, विरेश बने, सिद्धार्थ थोरात, लालखाँ पठाण, योगेश गुप्ता, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे, हिरासिंग राजपूत, महिला शिपाई पठाण आणि चिंचोळकर यांनी डमी ग्राहक पाठवून माहितीची पडताळणी केली असता सुनीता ही चार हजार रुपयांमध्ये वेश्यागमनासाठी तरुणी उपलब्ध करून देण्यास तयार झाली. यावेळी तिने तीन तरुणी ग्राहकाला दाखविल्या आणि घरातील खोली उघडून दिली. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी महिलेच्या घरावर धाड मारली. यानंतर तिच्याविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवून तिला अटक केली. पीडितांची सुटका करण्यात आली. आरोपी महिला ग्राहकाकडून घेतलेल्या चार हजार रुपयांपैकी स्वत: दोन हजार
घेत असे आणि २ हजार रुपये तरुणींना
देत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.