गणितामध्येच दडलेले असते उत्तर
By Admin | Published: December 20, 2015 11:45 PM2015-12-20T23:45:31+5:302015-12-20T23:58:46+5:30
औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या गणिताकडे पाहून घाबरता कामा नये. गुप्तहेर ज्याप्रमाणे समोर आलेले पुरावे न तपासता वेगळ्या दृष्टिकोनातून प्रकरणाकडे पाहतो
औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या गणिताकडे पाहून घाबरता कामा नये. गुप्तहेर ज्याप्रमाणे समोर आलेले पुरावे न तपासता वेगळ्या दृष्टिकोनातून प्रकरणाकडे पाहतो आणि अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी गणितातील उदाहरणांकडे पाहावे. बऱ्याचदा शालेय पातळीवर विचारल्या जाणाऱ्या गणितांमध्येच उत्तर दडलेले असते, असे प्रतिपादन बालशल्यचिकित्सक डॉ. विवेक घारपुरे यांनी केले.
राष्ट्रीय गणिती दिनानिमित्त मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या गणिती स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रविवारी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विवेक घारपुरे बोलत होते. गणिती संशोधक डॉ. वसंतराव टिकेकर, सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. एस. आर. जोशी, डॉ. पी. सी. सोमय्या, सचिव डॉ. एम. डी. जहागीरदार यांची उपस्थिती होती. प्रारंभी महाराष्ट्रातील थोर गणिती कै. कापरेकर यांचे चरित्र व गणित संशोधनाचा समावेश असलेल्या ‘द मॅन हू लिव्हड वीथ नंबर्स््-स्टोरी आॅफ कापरेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.