औरंगाबाद : औरंगाबादेत आणखी एका ओमायक्राॅनबाधित ( Omicron Variant in Aurangabad ) रुग्णाचे रविवारी निदान झाले. मात्र, चिंता करण्याचे कारण नसून या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, कोरोनाबाधित आढळून १० दिवस उलटले आहे. यासोबतच आज औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या ( Corona Virus ) नव्या रुग्णांची संख्या दोनशे पार गेली. जिल्ह्यात दिवसभरात तब्बल २३४ रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील सर्वाधिक १८३ आणि ग्रामीण भागातील ५१ रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबादमध्ये आतापर्यंत २ ओमायक्रॉन रुग्णांचे निदान झाले होते. हे दोन्ही रुग्ण उपचार घेऊन ओमायक्राॅनमुक्त झाले आहेत. परंतु, औरंगाबादमध्ये रविवारी आणखी एका रुग्णाची वाढ झाली. हा रुग्ण २४ वर्षीय तरुण आहे. सध्या तो होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
आज कोरोना रुग्णसंख्या दोनशे पार
जिल्ह्यात रविवारी ३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील २९ आणि ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण
हडको कॉर्नर १, सिडको एन वन येथे १, मिलिटरी हॉस्पिटल १, छावणी परिसर २, सिद्धार्थ उद्यान परिसर १, विमानतळ परिसर २, शहानूरमियाँ दर्गा परिसर ३, राजा बाजार परिसर १, एन तीन सिडको २, एन चार परिसर १, एन अकरा हडको १, एन दोन ठाकरेनगर २, एन दोन सिडको १, विठ्ठल चौक, रामनगर १, कैलासनगर १, बीड बायपास ५, व्यंकटेशनगर १, समृद्धीनगर १, वेदांतनगर १, पैठण गेट १, स्टेशन रोड २, उस्मानपुरा २, कोकणवाडी २, श्रेयनगर १, कांचनवाडी ३, शंभूनगर २, बाळकृष्णनगर १, उल्कानगरी १, नवीन शांतीनिकेतन कॉलनी २, केशरनगर २, भवानीनगर १, सिडको परिसर १, बन्सीलालनगर २, शिवाजीनगर २, सुधाकरनगर १, श्रेयनगर १, हनुमाननगर १, एन नऊ येथे १, एन सहा येथे २, एन अकरा येथे १, सम्राटनगर १, जालाननगर १, श्रीनिकेतन कॉलनी १, नारळीबाग परिसर १, सिडको, एन तीन १, अरिहंतनगर १, गारखेडा परिसर ७, शाहनूरवाडी १, पहाडसिंगपुरा १, एन पाच, सिडको १, एन सात, सिडको ६, एन आठ येथे १, बाबा पेट्रोल पंप परिसर १, रशीदपुरा १, मनजितनगर १, बायजीपुरा १, अन्य ९५
ग्रामीण भागातील रुग्णऔरंगबाद १२, फुलंब्री ३, गंगापूर १०, कन्नड ३, खुलताबाद ५, सिल्लोड २, वैजापूर ९, पैठण ७